Ad will apear here
Next
‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ थराराची लोणावळ्यात सांगता
संग्रहित फोटोमुंबई : भारतभरात प्रचंड लोकप्रिय असलेला ‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ या साहसी उपक्रमाचा १५०वा खेळ लोणावळ्यात नुकताच पार पडला. यात ‘टू-व्हील-ड्राइव्ह’ आणि ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ या दोन्ही प्रकारची महिंद्राची एकूण ६० वाहने सहभागी झाली होती. मुंबई, पुणे, नाशिक व परिसरातील ‘महिंद्रा’च्या ग्राहकांना या साहसी खेळाचा आनंद लुटला.

लोणावळ्याच्या तुंगी येथील ‘क्लब महिंद्रा’च्या प्रांगणात या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या, परंतु मुळात अत्यंत खडतर असलेल्या भूभागावरून बोलेरो, स्कॉर्पियो, एक्सयूव्ही, केयूव्ही आणि ‘महिंद्रा’ची सर्वात दणकट अशी ‘थर सीआरडीई फोर-बाय-फोर’ अशा ६० गाड्यांनी आपला थरारक प्रवास सुरू केला. लोणावळ्याच्या उंच-सखल भागात सहजपणे फिरत या ‘एसयूव्ही’ गाड्यांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली.

अतिशय उत्कंठापूर्ण असलेल्या या प्रवासाला लोणावळ्याच्या नयनरम्य वातावरणाची पार्श्वभूमी लाभली होती. प्रवासात सहभागी झालेल्या साहसवीरांना हा परिसर नेत्रसुखद वाटत असला, तरी खडतर रस्त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हानही मोठे होते. पुणे व मुंबई या दोन्ही शहरांना लोणावळा हे ठिकाण जवळ असल्याने दोन्हीकडील साहसवीरांना लोणावळ्यातीवल पावसाळी वातावरणाची व तेथील भूभागाची चांगलीच कल्पना होती.

या वर्षी स्पर्धकांना खडतर रस्त्यावरील आपले कौशल्य दाखविण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे भूभाग नेमून देण्यात आले होते. ‘टू-व्हील-ड्राइव्ह’ आणि ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ या दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी स्वतंत्र ट्रॅक दिल्याने दोन्ही वाहनांची कसोटी लागणार होती. विशेषतः ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ वाहनांना अधिक कठीण असे आव्हान देण्यात आले होते. निसरडी, तीव्र उतार, तीव्र चढण, पाण्याने खळाळणारे ओढे, खडकाळ जमीन अशा सर्व प्रकारच्या भूभागावरून आपली गाडी लिलया काढण्यातून स्पर्धकांना खेळाचा आनंद मिळत होताच, त्याशिवाय त्यांच्या गाड्यांची काटेकोर परीक्षाही होत होती.

‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ हा साहसी खेळ १९९६मध्ये स्पर्धा स्वरूपात सुरू करण्यात आला. नियमित रस्त्यावरून न जाता अन्य खडकाळ, खडतर रस्त्याने गाड्या चालवून ‘महिंद्रा’च्या ग्राहकांना आपले कौशल्य व गाडीचा कणखरपणा अजमावण्याची संधी या खेळातून दिली जाते. हा खेळ दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून, आता तो देशातील सर्वात थरारक खेळ बनला आहे. देशभरातील ‘महिंद्रा’चे चाहते व धाडसी ग्राहक या खेळात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

‘महिंद्रा’ची वाहने किती कणखर व मजबूत बांधणीची असतात, हे दाखविण्यासाठी महिंद्रा अॅडव्हेंचर या संस्थेमार्फत साहसी खेळांचे काही उपक्रम आयोजित करते. २०११मध्ये बिजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची उभारणी झाली. बिजय कुमार हे वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ असून, त्या संबंधीच्या एका लोकप्रिय मासिकाचे संपादक आहेत.

‘महिंद्राद्र अॅडव्हेंचर’ने यावर्षी अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये ‘ग्रेट एस्केप’सारखा खडतर रस्त्याच्या प्रवासाचा एक-दिवसीय धाडसी खेळ, विविध प्रकारची आव्हाने, अनेक दिवस चालणारे ग्रेट एस्केप जसे की मोनास्टरी एस्केप (१० दिवस), रॉयल एस्केप (सहा दिवस), ऑथेंटिक भूतान (आठ दिवस), हिमालयन स्पिटी एस्केप (१० दिवस) आणि एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅंपपर्यंत जाणारी समिट (१४ दिवस) अशा उपक्रमांचा समावेश आहे.

खडतर भूभागावरून वाहने चालविण्याच्या खेळाची लोकप्रियता वाढावी यासाठी ‘महिंद्रा अॅडव्हेंचर’तर्फे इगतपुरी येथे महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ रोड ट्रेनिंग अॅकॅडमी चालविली जाते. सुरक्षित व नियंत्रित वातावरणात खडतर भागात वाहन कसे चालवावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे दिले जाते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZQOBQ
Similar Posts
‘महिंद्रा’च्या पर्यावरणस्नेही डिजिटल अभियानाची सुरुवात मुंबई : महिंद्रा ग्रुपने नुकताच एका नवीन डिजिटल अभियानाला सुरुवात केली असून, वृक्षारोपणाचा संदेश देणाऱ्या या नवीन डिजिटल कॅम्पेनमध्ये वातावरणातील बदलांना रोखण्यासाठी एकजूट होण्यासाठी लोकांना प्रेरित केले जात आहे. '#RiseAgainstClimateChange' यावर लघुपट चित्रित करण्यात आला आहे.
‘आयएचसीएल’चे महाराष्ट्रात १७वे हॉटेल मुंबई : इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) ‘अॅस्पिरेशन २०२२’ या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत लोणावळ्यातील प्रवेशाची घोषणा केली आहे. कंपनीने काकडे समूहाचा भाग असलेल्या वाइल्ड्स अॅंड वॉटर डेव्हलपर्ससोबत व्यवस्थापन कंत्राटाच्या माध्यमातून ताजचे नवीन हॉटेल सुरू करण्यासाठी करार केला आहे.
‘महिंद्रा ग्रुप’ला ‘ऑर्गनायझेशन टू वॉच’ सन्मान बहाल मुंबई : महिंद्रा ग्रुपला ग्रीनबिझ ग्रुपच्या २०१९ साठीच्या वार्षिक ‘स्टेट ऑफ ग्रीन बिजनेस’ अहवालात ‘ऑर्गनायझेशन टू वॉच’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. ‘ईपी१००’चे पहिले स्वाक्षरीकर्ता म्हणून ऊर्जा उत्पादनात दुपटीने वाढ करण्याच्या महिंद्रा ग्रुपच्या प्रयत्नांसाठी, तसेच २०४०पर्यंत कार्बानोत्सर्जन संपूर्णपणे
‘महिंद्रा अँड महिंद्रा’ला ‘बेस्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्स– इंडिया २०१९’ पुरस्कार मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने ‘बेस्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्स– इंडिया २०१९’ हा प्रतिष्ठित बिझनेस व्हिजन (बीव्ही) पुरस्कार जिंकला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language